आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hc Sought Reply From Delhi Govt On How Was Gajendra Declared A Martyr

आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला शहीदचा दर्जा, HC ने केजरी सरकारला फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जंतर-मंतर येथे आपच्या रॅली दरम्यान आत्महत्या करणारा शेतकरी गजेंद्रसिंहला शहीदचा दर्जा देण्यावरुन दिल्ली हायकोर्टाने प्रश्न उपस्थित करत केजरीवाल सरकारला फटकारले आहे. कोर्टाने विचारले आहे की शेतकऱ्याला शहीदचा दर्जा कोणी आणि कोणत्या नियमांच्या आधारावर देण्याचा निर्णय घेतला ? हायकोर्टाने दिल्ली सरकारला या प्रकरणी चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.
आत्महत्येचे उदात्तीकरण करण्यासारखे
आम आदमी पार्टीने केंद्र सरकारच्या भू-संपादन कायद्या विरोधात 22 एप्रिल 2015 रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येते शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राजस्थानच्या दौसा येथून आलेले गजेंद्रसिंह या शेतकऱ्याने जंतर-मंतर येथील झाडावर चढून गळ्याला फास लावून घेतला होता. त्यानंतर दिल्ली सरकारने त्याला शहीदचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली सरकारच्या या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात एका वकिलाने याचिका दाखल केली होती. याचिकेत शेतकरी गजेंद्रसिंह यांच्या स्मृतीत जंतर-मंतर येथे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे, की अशा प्रकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आणि आत्महत्यांसारख्या प्रकारांचे उदात्तीकरण केल्यासारखे आहे.
जंतर-मंतर येथे धरणे - निदर्शनांना बंदी घालावी
याचिकेत विनंती करण्यात आली आहे, की जंतर-मंतर येथे भविष्य़ात व्यक्ती, पक्ष आणि समुहाला आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये ,असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना द्यावेत.