आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC To Decide Fate Of Odd even Formula On 11 January

ऑड इव्‍हन फार्म्युला : सरकारने मागितले अजून 7 दिवस, आता 11 ला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाढते प्रदूषण कमी करण्‍यासाठी दिल्ली सरकारने प्रायोगिक तत्‍त्‍वावर 15 दिवसांसाठी सम आणि विषम फॉर्म्‍युला लागू केला. मात्र, यामुळे दिल्‍लीकरांना त्रास होत असल्‍याची याचिका दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात दाखल करण्‍यात आली. त्‍यावर आता सोमवारी सुनावनी होणार असून, दिल्‍ली सरकारने सात दिवसांची मुदत मागितली.
कोर्ट म्‍हणाले, सहाच दिवस पुरेसे
यामुळे प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती घेण्‍यासाठी सहा दिवस पुरेसे आहेत. त्‍यामुळे 15 दिवसांसाठी हा फार्म्‍युला लागू करण्‍याची काय गरज होती ?, असा प्रश्‍न दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने बुधवारी विचारला. या बाबत दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
सहा दिवसांत का जमवली नाही माहिती...
- हा फॉर्म्‍युला लागू होऊन सहा दिवस झाले. मात्र, आतापर्यंत माहिती का गोळा केली नाही, असे न्‍यायालयाने विचारले.
- प्रदूषणाबाबत 8 जानेवारीपर्यंत माहिती गोळा करून न्‍यायालयाकडे त्‍याचा अहवाल सादर करण्‍याचेही आदेश न्‍यायालयाने दिले.
- सम- विषम फॉर्म्‍युला लागू झाल्‍यानंतर प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती मागितली.
- सरकारने हा फॉर्म्‍युला प्रायोगिक तत्‍वावर राबवला आहे. अजून दोन दिवस तो चालवता येऊ शकतो.
- या योजनेला सरकारने जास्‍त काळ चालवले तर नागरिकांची गैरसोय होईल.
- यामुळे प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती घेण्‍यासाठी सहा दिवस पुरेसे आहेत.