आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Health Minister Say He Would Like To Stress On Indian Culture In AIDS Fight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'एड्स\' रोखण्यासाठी \'कॉन्डोम\'पेक्षा भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती आवश्यक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आफ्रिका खंडातील देशांप्रमाणे संपूर्ण भारतात 'एड्‍स'चे संक्रमण पसरताना दिसत आहे. त्यात विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 'एड्‍स'चा नायनाट करणे, देशासमोर मोठे आव्हान आहे. एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यासाठी कॉन्डोम पेक्षा भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

डॉ.हर्षवर्धन यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स'ला मुलाखत देताना सांगितले, की एड्स आणि एचआयव्हीबाबत देशात सुरु असलेल्या जनजागृतीत बदल करण्याची गरज आहे. पती-पत्नीमधील शारीरिक संबंध हे समाजमान्य आहे. विशेष म्हणजे तो भारतीय संस्कृतीचा भाग आहे. मात्र, समाजातील नैतिकता ढासाळत चालली आहे. सध्या विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात प्रस्तापित केले जाताना दिसत आहे. यामुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास होत आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले कॉन्डोमचा प्रचार केल्याने समाजात चुकीचा संदेश जात आहे. कॉन्डोम वापणार्‍या व्यक्तीचा सगळेच संबंध सारखेच वाटतात. मग ते नैतिक असो अथवा अनैतिक यातील फरकच त्यांना कळत नाही. त्यामुळे एड्सचे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृतीत फक्त कॉन्डोमच्या वापरावर भर देणे चुकीचे आहे.

काय म्हणतात विशेषज्ज्ञ...
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशनचे (NACO) प्रमुख व्ही.के.सुब्बाराज यांच्या मते, कॉन्डोम वापरण्‍याबाबत सुरु असलेली जनजागृती ही फक्त हाय रिस्क समुहांतच केली जात आहे. 'अतिसंवेदनशील समुहातील लोकांना नैतिकताचा पाठ शिकवू शकत नसल्याचेही सुब्बाराज यांनी म्हटले आहे.

AIDSच्या संक्रमणात भारत तिसर्‍या क्रमांकावर...
भारतात 'एड्स'चा पहिला रुग्ण सन 1986 मध्ये आढळून आला होता. 1992 पासून नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशन (NACO) ही सरकारी संस्था 'एड्‍स'बाबात समाजात जनजागृती करत आहे. एड्सचे संक्रमण रोखण्यासाठी कॉन्डोमचा वापर करणे, स्वच्छ सिरिजचा वापर करण्यावर जोर दिला जात आहे. NACOच्या मते, भारतात 85 टक्के लोक असुरक्षित शारिरीक संबंध प्रस्थापित करत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी एड्‍सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एड्स संक्रमणात जगात भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. जवळपास 21 लाख लोक एचआईव्ही बाधित आहेत. आफ्रिकेत एड्‍सच्या रुग्णांची संख्या 61 लाख तर नायझेरियात 34 लाख आहे. 2011 मध्ये यूनाइटेड नेशन्सने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या दशकात भारतात एड्सच्या संक्रमणाचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले आहे.

(फाइल फोटोः केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन)