आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या घटनेचे 25 वे वर्ष; अयोध्या वादावर उद्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ लखनऊ- अयोध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. याची तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे सुमारे १६४ वर्षे जुन्या या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्ट सुनावणी सुरू करेल. दुसरे, ६ डिसेंबरला वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तिसरे कारण म्हणजे अयोध्या आंदोलनाला गती देणाऱ्या भाजपचे उत्तर प्रदेशात १५ वर्षांनंतर सरकार आलेे. अयोध्या मुद्द्यावर अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालानंतर ७ वर्षांनी सुनावणी होत आहे. या प्रकरणी ७ वर्षांपासून प्रलंबित २० याचिका या वर्षी ११ ऑगस्टला प्रथमच बोर्डावर आल्या. पहिल्याच दिवशी अनुवादावर प्रकरण अडकले. संस्कृत, पाली, पारशी, उर्दु आणि अरबीसह ७ भाषांमध्ये ९ हजार पानांचा अनुवाद करण्यासाठी कोर्टाने १२ आठवड्यांची मुदत दिली होती.

 

> 300 भागांत सुप्रीम कोर्टात प्रकरणाविषयीची कागदपत्रे  जमा
> 150 हून अधिक पुस्तकांचा या दस्तऐवजांत समावेश

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सविस्‍तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...