आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heart Stent Now 7 To 30 Thousand Rupees, The Government Imposed A Limit On The Maximum Cost

हृदयविकाराचे स्टेंट अाता 7 ते 30 हजार रुपयांत, सरकारने घातली कमाल किमतीवर मर्यादा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हृदयविकारात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या स्टेंटच्या किमतीत सरकारने मोठी कपात केली आहे. सर्व प्रकारच्या स्टेंटच्या किमतीत ८५ टक्के कपात केल्याने स्टेंट बसवणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. राष्ट्रीय औषधनिर्माण किमती प्राधिकरणाने (एनपीपीए) जारी केलेल्या पत्रकानुसार अाता धातूच्या स्टेंटच्या किमती जास्तीत जास्त ७२६० रुपये तर विरघळणाऱ्या व इतर प्रकारच्या स्टेंटच्या किमती २९,६०० रुपयांपर्यंत राहतील. सरकारच्या या दर कपातीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनपीपीएच्या संकेतस्थळानुसार, सध्या या स्टेन्टच्या किमती २५ हजार रुपये ते १.९८ लाख रुपयांपर्यंत आहेत. 
 
बहुतेक रुग्णालये या स्टेन्टच्या माध्यमातून मोठा नफा कमावत आहेत. स्टेन्टच्या व्यवहारातील नफ्याचे प्रमाण ६५४ टक्के एवढे प्रचंड आहे. स्टेन्टची निर्मिती ते रुग्णांपर्यंतच्या प्रवासात अनेक अनैतीक प्रकार आहेत. त्यामुळे स्टेन्ट रुग्णांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या किमती अवाजवी, बेसुमार पध्दतीने वाढतात. यामुळे रुग्ण आर्थिक संकंटात सापडतो. अशा परिस्थतीत स्टेन्टच्या कमाल किमतीवर मर्यादा घालणे सार्वजनिक हिताचे असल्याने स्टेन्टच्या किमतीत कपात करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण एनपीपीएने दिले आहे. सरकारने स्टेन्टचे महत्त्व लक्षात घेऊन जुलै २०१६ मध्ये स्टेन्टचा समावेश राष्ट्रीय जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये स्टेन्टचा समावेश औषधी किमती नियंत्रण कायदा-२०१३ च्या पहिल्या सूचीत करण्यात आला आहे.
 
रुग्णांची लूट थांबणार
प्रत्येक कंपनीच्या स्टेंटवर किमतीपेक्षा दीडपट अधिक एमआरपी छापलेली असते. त्याचा फायदा रुग्णालये घेतात. उदा. विविध परदेशी कंपन्यांचे स्टेंट ४० हजारांत भारतात उपलब्ध होतात. रुग्णालयांचे हाताळण्याचे शुल्क १० हजार धरले तर ५० हजारांत स्टेंट मिळायला हवा. स्टेंटवर दीड लाख एमआरपी छापलेली असते. अशा वेळी रुग्णालये रुग्णांकडून दीड लाख वसूल करतात. म्हणजे रुग्णालयाला जवळपास १ लाख १० हजारांचा फायदा होतो.या प्रकाराला आता आळा बसणार आहे.  हेच निरीक्षण एनपीपीएने नोंदवले व स्टेंटच्या किमतीत ८५ टक्के कपात करत कमाल मर्यादा घातली आहे.
 
६५४% एवढे प्रचंड आहे स्टेंटच्या व्यवहारातील सध्याचे नफा प्रमाण
१.९८ लाखांपर्यंत आहेत सध्या स्टेंटच्या किंंमती
बातम्या आणखी आहेत...