आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठमध्ये दगडफेकीनंतर तणाव, गाझियाबादमध्येही समोर आले धर्मांतराचे प्रकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मेरठच्या घटनेविरोधात गाझियाबादमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नवी दिल्ली - मेरठच्या खरखौदामध्ये तरुणीवर बलात्कार आणि बळजबरी धर्माँतराचे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीच्या सरवा गावात तणाव निर्माण झाला आहे. पीडितेच्या गावच्या काही तरुणांना शेजारच्या तोडी गावाच्या काही तरुणांनी माराहाण केली. तसेच केली गावात एका धार्मिक स्थळावर आणि काही घरांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दोन संप्रदायांमध्ये याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गाझियाबाद येथेही बळजदबरीने धर्मांतराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

खरखौदाप्रकरणी केंद्राने उत्तरप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला असतानाच गाझियाबादच्या लोणी नावाच्या एका वाडीतही अशा प्रकार समोर आला आहे. येथे काही तरुण एका अल्पवयीन मुलीला फसवून घेऊन गेले आणि तिचे धर्मांतर करून तिच्याशी दिल्लीत एका धार्मिक स्थळी विवाह केला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आरोपींवर रासुकाअंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी जमावाने पोलिस ठाण्याच्या परिसरात गदारोळ केला. पोलिसांनी कारवाई करत, परिस्थिती नियंत्रणात आणली.

या मुलीला शेजारी राहणारा एक युवक पळवून घेऊन गेला होता. त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलीला जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर करून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. गृहसचिव कमल सक्सेना आणि पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) अमरेंद्र सिंह सेंगर यांनी तरुणीच्या जबाबाच्या आधारे तिचे धर्मांतर झाले नसून ती स्वतःच्या मर्जीने मुलाबरोबर गेल्याचा दावा केला आहे.

मदरसा शिक्षक अटकेत
मेरठच्या खरखौदा प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री फुलत (मुजफ्फरनगर) गावात छापा टाकत एका मदरसा शिक्षकाला अटक केली आहे. एका युवतीला बंदी बनवून ठेवल्याचे कारण पोलिस सांगत आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा संबंध खरखौदा येथील घटनेशी आहे. पीडितेच्या कॉल रेकॉर्डच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे. पीडितेने जबाबात तिला एका मदरशामध्ये ठेवण्यात आले होते, असे म्हटले आहे.
पुढे पाहा - पीडितेला भेटण्यासाठी गर्दी