आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात होरपळ; आजवरचे विक्रम मोडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पारा रविवारीही विक्रमी पातळीवर होता. दिल्लीत रविवारी 45.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पालम विमानतळ भागात सर्वाधिक 47.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. राजधानीत गेल्या 62 वर्षांतील हा विक्रम आहे. राजस्थानातही उन्हाचा प्रकोप सुरू असून भिंडमध्ये तर पार्‍याने गेल्या 116 वर्षांतील विक्रम मोडला आहे. येथे 50 अंश तापमानाची नोंद झाली.

केरळमध्ये थांबलेला मान्सून गती घेणार
केरळच्या किनारपट्टीवर येऊन दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर मान्सून पुन्हा गती पकडेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग सुकर झाला आहे. हवामानात बदल झाल्याने केरळमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान उत्तर भारतातील उन्हाचा प्रकोप 12 जूनपर्यंत राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.