आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात उष्णतेची लाट: 15 दिवसात 150 जणांचा मृत्यू, उन्हाळा आणखी असह्य होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणखी एक आठवडाभर कडक उन्हाळ्याच्या झळा देशाला सोसाव्या लागतील असे हवामान खात्याने म्हटले आहे. - Divya Marathi
आणखी एक आठवडाभर कडक उन्हाळ्याच्या झळा देशाला सोसाव्या लागतील असे हवामान खात्याने म्हटले आहे.
नवी दिल्ली- मागील दोन आठवड्यापासून देशात उष्णतेने कहर केला आहे. गेल्या 15 दिवसात देशभरात विविध ठिकाणी सुमारे 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ओडिशा येथील टिटलागड भागातील तापमान तब्बल 47 डिग्रीवर पोहचले तर तेलंगाणातील रामागुंडम येथे 46 डिग्रीवर पोहचले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वात जास्त तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान, कडक उन्हाळा पडल्याने देशातील 91 मोठ्या धरणातील पाणी साठ्याची पातळी 22 टक्केपर्यंत खाली आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
देशात कुठे किती नोंदवले गेले तापमान
- तेलंगणातील निजामबादमध्ये 45.1 डिग्री टेम्परेचर रिकॉर्ड केले गेले.
- आंध्रप्रदेशमधील अनंतपुर जिल्ह्यात 44 डिग्री तर करनूल येथे 43.4 डिग्री रिकॉर्ड केले गेले.
- तिरुपती येथे कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. शुक्रवारी तेथे 42.1 डिग्री तापमान नोंदले गेले.
- यूनियन वाटर रिसोर्स मिनिस्ट्री यांच्या माहितीनुसार, देशातील 91 धरणातील पाणी पातळी 22 टक्केपर्यंत खाली आली आहे.
- शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार, 21 एप्रिलपर्यंत या धरणातील साठा 34.082 बिलियन क्यूबिक मीटर (बीसीएम) एवढा उरला आहे.
- हिमाचल, तेलंगणा, पंजाब, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, तमिळनाडु, कर्नाटक आणि केरल यासारख्या राज्यांत मागील वर्षापूर्वी यंदा पाण्याची पातळी कमालीची घसरली आहे.
आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू-
- मागील 15 दिवसात 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दररोज 10 लोकांचा मृत्यू होत आहे.
- यातील आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील 90 लोकांचा समावेश आहे.
- ओडिशा राज्यात मागील एक महिन्यापासून आतापर्यंत 72 लोक उन्हामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
कडक उन्हाळा कशामुळे ?
- हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अल निनो, ग्लोबल वॉर्मिंग ही कारणे आहेत. सलग दोन वर्षे देशात कमी पाऊस झाल्याने उन्हाळा असह्य झाला आहे.
याचा धोका काय?
- सर्वात मोठा धोका लू आणि हीट स्ट्रोकचा आहे. कडक उष्णतेमुळे आतापर्यंत 220 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यातील 120 मृत्यू आंध्र-तेलंगणात झाले आहेत.
- आंध्र-तेलंगणात गेल्या वर्षी 1100 मृत्यू झाले होते तर देशात 2035 लोक मृत्यूमुखी पडले होते.
यंदाचा अंदाज काय?
- 2016 सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदले जाऊ शकते. 1880 पासून नोंदले जात असलेल्या आकडेवीरानुसार, 2015 मध्ये सरासरी तापमानात 0.90 डिग्री इतकी वाढ झाली आहे.

पुढे वाचा, कृषी उत्पन्नात होणार घट...