आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रासह उष्णतेच्या लाटेने देश तापला, ६८ जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशभरात सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, उष्णतेच्या तीव्र लाटेने बहुतांश भाग होरपळून निघत असून आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशात उष्णतेच्या लाटेने ६५ जणांचे बळी घेतले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणमधील बहुतांश भागात तापमान ४५ अंशांच्या वर गेले आहे. उत्तर भारतही कोरडे हवामान आणि उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे.

उष्णतेच्या लाटेने तेलंगण आणि आंध्र प्रदेशात ४३, ओडिशामध्ये २३, तर प. बंगालमध्ये २ जणांचे बळी गेले आहेत. राजधानी दिल्लीत शुक्रवारी ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हे यंदाचे सर्वाधिक तापमान होते. देशातील ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असून तळपत्या उन्हात बाहेर पडू नये, असा खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी चंद्रपुरात ४७.६ अंश सेल्सियस असे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. राज्यातील इतर शहरांतही जास्त तापमान नोंदवले गेले.