आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये वादळ, वीज कोसळून 27 जणांचा मृत्‍यू; ईशान्‍य भारतात लवकरच मान्‍सून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमध्‍ये जोरदार वादळवाऱ्यामूळे घरांचे असे नूकसान झाले आहे. - Divya Marathi
बिहारमध्‍ये जोरदार वादळवाऱ्यामूळे घरांचे असे नूकसान झाले आहे.
नवी दिल्‍ली-  बिहारमध्‍ये रविवारी वीजांच्‍या कडकडाटासह जोरदार वादळ आले. यादरम्‍यान वीज कोसळून 27 लोकांचा मृत्‍यू झाला आहे. मान्‍सूनमूळे देशभरातील वातावरणात बदल होत आहे. राजस्‍थानच्‍या गंगानगरमध्‍ये 45 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बंगालच्‍या उपसागरात अधिक दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे मान्‍सून केरळपूर्वी उत्‍तर-पूर्व भागाकडून भारतात प्रवेश करु शकतो. 29 किंवा 30 तारखेपर्यंत उत्‍तर-पूर्व भागांत मान्‍सूनचा पहिला पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्‍याने दिली आहे. भारतात नेहमी दक्षिण-पश्चिममधून मान्‍सूनचे आगमन होते.
 
पूर्व मध्‍य बंगालच्‍या उपसागरात 'मोरा' चक्रीवादळ धडकले आहे. येत्‍या बारा तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढण्‍याची शक्‍यता आहे. मान्‍सूनच्‍या वाटचालीसाठी ही स्थिती अधिक पुरक आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्‍याने दिली आहे.

भारतात अशी आहे हवामानाची स्थिती
1. बिहार
- राज्‍यात मागील 24 तासांपासून वादळ आणि वील कोसळल्‍यामुळे 27 लोकांचा मृत्‍यू झाला आहे. - पश्चिम आणि पूर्व चंपारणमध्‍ये 11, जमुईमध्‍ये 5, मुंगेर, भागलपुर आणि मधेपुरामध्‍ये 2-2, हाजीपूर, छपरा, दरभंगा, नवादा, समस्‍तीपूर मध्‍ये 1-1 व्‍यक्तिंचा मृत्‍यू झाला आहे. - जमुईमध्‍ये वीज कोसळण्‍याचा जोराचा आवाज आल्‍याने एका महिलेचा हृदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यू झाला. राखी देवी असे महिलेचे नाव आहे.
- तसेच जोरदार वादळ आणि वीजेमुळे बेतिया आणि मोतिहारी जिल्‍ह्यामध्‍येही अनेकांचे नुकसान झाले.
- बेतियामध्‍ये 6 आणि मोतिहारीमध्‍ये 5 लोकांचा या वादळामुळे मृत्‍यू झाला आहे.
- योगापट्टीमधील कौवलापूरमध्‍ये वादळमुळे घर कोसळून त्‍याखाली दबल्‍याने 5 जणांचा मृत्‍यू झाला आहे. तसेच साठी थानामध्‍ये 5 मुलांवर वीज कोसळल्‍याने त्‍यातील एका जणाचा मृत्‍यू झाला आहे. उर्वरित चारजण गंभीररित्‍या जखमी झाले आहे.
 
2. मध्‍यप्रदेश
- मध्‍यप्रदेशमधील सागर जिल्‍ह्यात वीज कोसळून 3 जणांचा मृत्‍यू झाला आहे. सागर, रीवा, दमोह, जबलपूर, छिंदवाडा आणि खजुराहोमध्‍ये रविवारी मुसळधार पाऊस पडला.
- गाडरवारामध्‍ये जोरदार वा ऱ्यामूळे एक झाड कोसळून रियाज अली (45) यांचा मृत्‍यू झाला.
- भोपाळमध्‍ये सोमवारी पाऊस पडण्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. याव्यितिरिक्‍त मध्‍यप्रदेशातील अनेक भागांमध्‍ये मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्‍याने दिली आहे.
 
3. हिमाचलच, चंदीगड, पंजाबमध्‍ये पाऊस
-  हिमाचलच, चंदीगड, पंजाबमध्‍ये रविवारी तापमान 2 डिग्री अंश सेल्सिअसने घसरल्‍यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
- चंदीगडमधील अंबालामध्‍ये रविवारी तापमान 37 अंश सेल्सिअस एवढे होते.
- हरियाणामधील सर्व जिल्‍ह्यात रविवारी सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमान होते.
- हिमाचलमधील शिमलामध्‍ये 24 अंश सेल्सिअस, मनालीमध्‍ये 25, उनामध्‍ये 39, नाहनमध्‍ये 35, भुंतरमध्‍ये 33, धर्मशालामध्‍ये 32 आणि कांगडामध्‍ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
 
4. दिल्‍लीमध्‍ये पाऊस
- दिल्‍लीमध्‍ये रविवारी पाऊस बरसला तसेच आज सोमवारीही पावसाने हजेरी लावली आहे.
- पावसामुळे दिल्‍लीच्‍या तापमानामध्‍ये 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
- सोमवारी 22.5 अंश सेल्सिअस एवढे दिल्‍लीचे तापमान होते.
राजस्‍थानमध्‍ये सर्वाधिक 48 अंश सेल्सिअ तापमान
-  राजस्‍थानमधील गंगानगरमध्‍ये सर्वाधिक 48 अंश सेल्सिअ तापमानाची नोंद झाली आहे.
-  राजस्‍थानमध्‍ये अजूनही तापमानात कोणताही बदल झाला नसून तेथे पाऊस पडण्‍याची कोणतीही शक्‍यता नाही, असे हवामान खात्‍याने सांगितले आहे.
 
पुढील 24 तासांत येथून पुढे येऊ शकतो मान्‍सून
- हवामान खात्‍याच्‍या अंदाजानूसार मालदीव, कोमारीन, दक्षिण-पूर्व बंगालची खाडी, पूर्व-मध्‍य बंगालची खाडी, दक्षिण-पश्चिम बंगाल खाडीच्‍या काही भागांमधून मान्‍सून भारतात प्रवेश करु शकतो.   
       
 
बातम्या आणखी आहेत...