आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्माघाताचे देशभर २६० बळी, तेलगू पट्ट्यात पारा ४८ अंश सेल्सियसवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात उष्णतेच्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. उन्हाच्या तडाख्यात आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणात उष्णतेचे ७० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. शनिवारी खम्मम जिल्ह्यात पारा ४८ अशांवर पोहोचला. तेलंगणात १२८, आंध्रात ९५, ओडिशात २६, प. बंगालमध्ये १० आणि झारखंडमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

विदर्भात काही ठिकाणी पारा घसरल्याने दिलासा मिळाला. चंद्रपूरात ४७, नागपुरात ४५.१ अंश तापमान होते. नांदेडमध्ये कमाल तापमान ४१.३ से. नोंदवण्यात आले. राजधानी दिल्लीतही ४४.५ अंश हे यंदाचे सर्वाधिक तापमान नोंदले. राजस्थानच्या अलवर व छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये पारा ४७ अंशावर होता. झारखंडच्या मेदिनीनगरमध्ये ४६.६ अंश तापमान होते. हरियाणात भिवानीमध्ये ४५.२, पंजाबच्या अमृतसरमध्ये ४३.६ अंश तापमान होते.

औरंगाबादेत मंगळवारच्या ४३.८ अंशांच्या तुलनेत शनिवारी तापमान ३.४ अंशांनी घसरून ४०.४ अंश सेल्सियसवर स्थिरावले आहे.