आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी पारा ४५ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमधील कोझिकोड येथे उष्णतेमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
केरळमधील कोझिकोड येथे उष्णतेमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - सध्या देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट असून २ मे हा या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये सोमवारी कमाल ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर पालममध्ये पारा तब्बल ४६.२ अंश सेल्सियसवर पोहोचला.

हवामान खात्याच्या मते, मागील ५ वर्षांत २ मे इतका तप्त अन्य कोणताच दिवस नव्हता. दरम्यान, उष्माघातामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या १७८ वर पोहोचली असून शुक्रवारी हा आकडा १४३ वर होता. नालगोंडात ५३ तर ओडिशामध्ये १४ लोक मरण पावले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, तमिळनाडूसह पंजाब आणि संपूर्ण उत्तर भारत उष्माघाताच्या तावडीत आहे. याठिकाणी किमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस तापमान आहे. दुसरीकडे, भारतात काही ठिकाणी पावसाची स्थिती असून काही ठिकाणी ताशी ४५ किमीच्या वेगाने मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मात्र परिस्थिती यापेक्षा वेगळी असून जंगलात लागलेल्या वणव्याने या भागात हाहाकार माजवला आहे.

झारखंड, बिहार, छत्तीसगडसह अनेक राज्यांतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवल्या गेले. त्यामुळे दुपारच्या वेळी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र विविध शहरांमध्ये दिसत होते.

महाराष्ट्रात काही अंशी दिलासा: देशभरात उष्णतेची लाट असली तरी महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी पावसाची पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, वारे वाहत असल्यामुळे राज्यातील तापमान काही प्रमाणात घटले आहे. उपराजधानी नागपुरात सोमवारी सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील हवामानाचा परिणाम मंगळवारीही कायम राहील. सकाळच्या वेळी पावसाच्या किरकोळ सरी पडू शकतात. पावसाची ही स्थिती गुरुवारपर्यंत कायम असू शकते, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढे वाचा, हिमाचलमध्ये तब्बल ३७८ जंगलांना आग...
बातम्या आणखी आहेत...