आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील हल्ल्याचा कट उधळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. पोलिसांच्या विशेष दलाने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. एका गेस्ट हाऊसवर टाकण्यात आलेल्या छाप्यात काही शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.


छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांनी एके 47 सह इतर शस्त्रे आणि स्फोटकांच्या पाच बॅगादेखील जप्त केल्या आहेत. या विश्रामगृहाला सील ठोकण्यात आले आहे. पोलिसांच्या विशेष दलाने छाप्याची कारवाई सुरू करताच हाजी अराफत गेस्ट हाऊसला घेराव घातला. हल्ला कधी आणि कोठे केला जाणार होता, याची माहिती मिळू शकली नाही. तपास अजून पहिल्या टप्प्यात आहे, असे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले.


हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी सय्यद लियाकत शाह याला अटक करण्यात आल्यानंतर छाप्याची कारवाई करण्यात आली. त्यास दोन दिवसांपूर्वी गोरखपूरमध्ये पकडण्यात आले होते. दिल्लीची रेकी करण्यात आल्याचे लियाकतने चौकशीत कबूल केले होते. होळीच्या जवळपास हल्ला करण्याची त्यांची तयारी होती.