आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर भारतातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या उत्तरेकडील राज्यांत मंगळवारी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. पंजाबमध्ये शेकडो गावांना पाण्याने वेढले आहे. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. ऋषीकेश-गंगोत्री भागात पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. बिहार, बंगाल, मध्य प्रदेशातही पुराचा तडाखा बसला आहे. देशातील अनेक राज्यांतील शेती पाण्यात बुडाली आहे. आंध्र प्रदेशात 90 लाख हेक्टर शेती, उत्तर प्रदेशात 70 लाख हेक्टर, बिहार 50 लाख हेक्टर, आसाम 40 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.


05 कोटी हेक्टर एवढी देशातील एकूण शेती पाण्यात
200 गावांना पंजाबात पुराच्या पाण्याने वेढले.
120 कोटी रुपयांचे पूरग्रस्त नागरिकांना उत्तराखंडात वाटप.