आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात जोरदार पाऊस, पेरण्यांना वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या दोन आठवड्यांत देशभरात मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार 23 जुलैपर्यंत झालेल्या पावसात गतवर्षीच्या तुलनेत फक्त 25 टक्के कपात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी समाधानकारक पावसामुळे पेरण्या लवकरच पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली आहे.
मागच्या आठवड्यात 533.2 लाख हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाली. गेल्या वर्षीच्या पेरणीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी यंदा घट आहे. उत्तर भारताच्या अनेक भागांत हलका व मध्यम प्रतीचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे पाच जणांचा मृत्यू व 10 जण वाहून गेल्याचे वृत्त आहे.
छत्तीसगडमध्ये जगदलपूरपासून 90 किमीवर असलेल्या जैपूरकोरापूट येथील रेल्वेमार्गावर अनेक जागी दरडी कोसळल्याने वाहतूक खंडित झाली आहे. रात्री 1 वाजेच्या सुमारास दुर्ग जगदलपूर एक्स्प्रेस रेल्वे जरटी मल्लिगुडा येथे अडकून पडली. एकूण 70 प्रवासी रात्रभर जंगलात अडकून राहिले. त्यांना 10 तासांनंतर सोमवारी कोरापूट येथे नेण्यात आले.