आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरेत नद्या धोक्याच्या पातळीवर; आसामातील 25 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तरेकडील अनेक राज्यांत मान्सूनने चांगलीच लय पकडली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणामधील नद्यांना पूर आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. दुसरीकडे आसाममधील चित्र मात्र गंभीर बनले आहे. राज्यातील 42 गावांना पुराचा फटका बसला.

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नेमाटीघाट, धुबरी, बेकी 42 गावांना पुराने वेढले आहे. त्यामुळे 25 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या नदीवरील माजुली बेटावर गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे स्थिती आणखीनच बिघडली आहे.

उत्तरेत बुधवारी मुरादाबाद, शहाजहांपूर, फतेहगड, ललितपूर, बलिया, बांदामध्ये 10 ते 25 मिमी पावसाची नोंद झाली. हरियाणात अंबालामध्ये 51 मिमी, पंजाबमध्ये अमृतसरमध्ये 23 मिमी पाऊस झाला. चंदिगडमध्ये 30 मिमी पाऊस झाला. राजस्थानच्या बिकानेर आणि इतर भागात चांगला पाऊस झाला. हिमाचल प्रदेशातील सोलन, सिरमौर, हमीरपूर, कांगडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता.

धरण पातळीत घट : पंजाब, हरियाणा, राजस्थान ही तीन राज्ये भाकरा, पाँग धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु यंदा दोन्ही धरणांची पाणीपातळी कमालीची घटली आहे. गेल्या वर्षी जुलैच्या अखेरीस भाकरामध्ये पाणीपातळी 59 हजार 118 क्युसेक एवढी होती. यंदा मात्र ती 19 हजार 957 अशी घसरली आहे. त्याचा परिणाम वीज निर्मितीवरदेखील झाला आहे.