आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्ध्‍वंसः हेलिकॉप्‍टरमधून घेतलेल्‍या फोटोंमधून पाहा उत्तराखंडच्‍या महाप्रलयाचा कहर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तराखंडमध्‍ये आलेल्‍या महापुराचा भारतीय सैन्‍याने हेलिकॉप्‍टरद्वारे आढावा घेतला आहे. सैन्‍याच्‍या जवानांनी पुराची अतिशय विदारक आणि भीषण छायाचित्रे काढली आहे. प्रकृतीच्‍या विरोधात जाऊन मानवाने केलेल्‍या कृत्‍याचे फळ भोगावे लागल्‍याचे ही छायाचित्रे पाहून स्‍पष्‍ट होते. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाला हवामान खात्‍याने दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाचा आणि या प्रलयाचा इशारा दिला होता. त्‍यावर सरकारने तत्‍काळ पावले उचलली असती तर मोठी प्राणहानी टाळता आली असती.

हवामान खात्‍याच्‍या अधिका-यांनी सांगितले की, उत्तराखंड सरकारला दोन दिवसांपूर्वीच इशारा देण्‍यात आला होता. मुख्‍यमंत्री कार्यालयासह राज्‍याच्‍या विविध विभागांना माहिती देण्‍यात आली होती. बुधवारी राष्‍ट्रीय आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने घेतलेल्‍या आढावा बैठकीत हवामान खात्‍याने लेखी स्‍वरुपात ही माहिती .दिली आहे.

पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा उत्तराखंडमधील विद्ध्‍वंसाची आणखी छायाचित्रे...