आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heavy Rainfall Causing Problems For Lakhs Of People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचा फटकाः लाखोंचे जीवन प्रभावित, महाराष्‍ट्रात 238 बळी; शेजारचे देशही संकटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या पावसाने विश्रांती घेतली असली तरीही गेल्‍या आठवड्यात मुसळधार पावसामुळे अर्धा महाराष्‍ट्र पाण्‍याखाली गेला होता. सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. अजुनही चंद्रपूरसारख्‍या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. एकीकडे महाराष्‍ट्रातील एक भाग अतिवृष्‍टीमुळे त्रस्‍त झाला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्याला आणखी पावसाची प्रतिक्षा आहे. जायकवाडी धरणाचा साठा 15 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरीही मराठवाड्याची तहान भागविण्‍यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

महराष्‍ट्रासोबतच उत्तर भारतातही मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्‍य प्रदेश आणि गुजरातमध्‍येही धो धो पाऊस पडला. जम्‍मू आणि काश्मिरमध्‍येही ढगफुटी आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्‍कळीत केले आहे. भारताचे शेजारी पाकिस्‍तान आणि चीनही पावसाच्‍या संकटात आहेत. महाराष्‍ट्रात आतापर्यंत पावसाने 238 जणांचे बळी घेतले आहेत. त्‍यापैकी 106 बळी विदर्भातील आहेत. तर पाकिस्‍तानमध्‍ये 50 जणांचा मृत्‍यू झाला आहे. चीनमध्‍ये अतिवृष्‍टीनंतर आता दुष्‍काळाचे संकट ओढावले आहे.