अहमदाबाद / नवी दिल्ली - गुजरात आणि ओडिशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अवाक्याबाहेर गेली आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा फटका 8 लाख लोकांना बसला आहे. तसेच आतापर्यंत 65 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशभर विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसात अपघातांमुळे 8 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, हिमाचल, उत्तराखंड दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ठिक-ठिकाणी पाऊस सुरूच आहे. यूपीत गंगा आणि घाघरा नद्यांसह मोठ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडणार अशी शक्यता आहे. हवमान विभागाने येत्या 24 तासांत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
वलसाडचा रेलवे ट्रॅक बुडाला, अनेक गाड्या रद्द
- गुजरातच्या अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. वलसाडच्या उमेरगाम येथे 99 आणि कपराडा येथे 98, कच्छच्या मांडवीत 94 आणि अहमदाबादेत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात पुरामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
- वलसाडमध्ये रेलवे ट्रॅक पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे, सूरत-मुंबईसह अनेक रेल्वे मार्ग बंद आहेत. शहरात अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे, वसलाड आणि अहमदाबादेत दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.