नवी दिल्ली - उकाड्याने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना बुधवारी अखेर पावसाने दिलासा दिला आहे. दिल्लीतील अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्या आहेत. जवळपास महिनाभर ओढ दिलेल्या पावसाचा आनंद अनेक दिल्लीकरांनी घेतला. पावसामुळे दिल्लीच्या तपमानात घट झाली आहे. शाहदरा, यमुना विहार, सीलमपूर, दिलशाद गार्डन, मोजपूरसह अनेक भागात जोरदार वार्यासह पाऊस झाला. दिल्लीकर अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहात होते. यंदा दिल्लीच्या गर्मीने अनेक रेकॉर्ड मोडले होते.
सर्व छायाचित्र - भूपिंदर सिंह