आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rains Thunderstorm Strong Wind In Delhi News In Marathi

PHOTOS: दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील हवामान आज (शुक्रवार) अचानक पालटले. जोरदार वादळासह आलेल्या मुसळधार पावसाने तापमानात घट झाली. यावेळी वादळाचा एवढा तडाखा बसला, की सायंकाळी पाच वाजताच आकाश काळेकुट्ट झाले. दिल्लीतील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दिल्लीतील काही भागांमध्ये गारपीट झाल्याचीही माहिती मिळाली आहे. जोरदार वादळामुळे जहांगीरपूर-गुडगाव लाइनवरील मेट्रो काही काळासाठी थांबविण्यात आल्या होत्या. द्वारका-नोएडा मार्गावरही अशीच परिस्थिती असल्याचे समजते.
जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाचे फोटो पुढील स्लाईडवर