आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heavy Rains Trigger Landslide In Manipur 21 Dead Flood Situation In Bengal Odish

VIDEO : गुजरातमध्‍ये डेयरी इंडस्ट्री नेस्‍तनाबूत; एक लाख म्‍हशींचा मृत्‍यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा
नवी दिल्ली/अहमदाबाद - देशात ओडिसा, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्‍ये अतिवृष्‍टीचा हाहाकार सुरूच आहे. गुजरातमध्‍ये दोन दिवस झालेल्‍या मुसळधार पावसामुळे 70 व्‍यक्‍तींचा मृत्‍यूचा झाला. बनासकंठा जिल्‍ह्यातील बनास डेयरीने दावा केला की, या एकाच जिल्‍ह्यात अतिवृष्‍टीमुळे तब्‍बल एक लाखपेक्षा अधिक गाय-म्‍हशी मृत्‍यूमुखी पडल्‍यात. दरम्‍यान, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्‍या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बंगालमध्‍ये 40 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला तर ओडिशामध्‍ये पाच लाख लोक विस्‍तापित झाले.
दूध संकलात निच्‍चांक
बनासकंठा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव मिल्क प्रोड्यूशर यूनियन लि. (बनास डेयरी) सूत्रांनी सांगितले, या एकट्या जिल्‍ह्यातून ‘अमूल’साठी रोज 35 लाख लीटर दुधाचे संकलन होत होते. पण, पूर परिस्थितीमुळे आज (रविवार) केवळ दोन लाख लीटर दूध संकलन झाले. हा निच्‍चांक आहे.
गुजरातमध्‍ये नद्यांना पूर
गुजरातमध्‍ये नर्मदा आणि साबरमती या नद्यांना महापूर आला आहे. साबरमतीवर बांधलेल्‍या धरणातून 1.80 लाख क्यूसेक पाणी सोडल्‍यानंतर खेडा जिल्‍ह्यातील अनेक गावे पाण्‍याखाली आली आहेत. त्‍या ठिकाणरी होड्या आणि हेलिकॉप्टरद्वारे मदत पोहोचवली जात आहे.
मणिपूरच्‍या चंदेल जिह्यात भूस्खलन; 21 जणांचा मृत्‍यू तर हजारो बेघर
देशाच्‍या पूर्व भागात अ‍ति‍वृष्‍टीचा कहर सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी मणिपूर-म्यानमार सीमेवर असलेल्‍या चंदेल जिलह्यातील चौउमोल गावात अचानक भूस्खलन झाले. यामध्‍ये बहुतांश घरे ढिगा-यााखाली गडप झालीत. या दुर्घटनेत 21 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला आहे तर हजारो लोक बेघर झालेत. घरांच्‍या ढिगा-याखाली दबलेल्‍या नागरिकांना काढण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्‍यान, उत्तराखंडमध्‍येही गंगोत्रीकडे जाणा-या मार्गावर काही ठिकाणी जमीन खचल्‍याचे वृत्‍त आहे; त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरील वाहतूक बंद करण्‍यात आली.
का होत आहे अतिवृष्‍टी
बंगालच्‍या खाड़ीमध्‍ये 'कोमेन' वादळ आले आहे. त्‍यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड सह पूर्वेकडील भागात अतिवृष्‍टी होत आहे. त्‍यामुळे हाहाकार उडाला आहे. हवामान खात्‍यानुसार, बंगाल आणि ओडिशामध्‍ये रविवारी पावसापासून काही अंशी दिलासा मिळेल. मान्सून पश्चिम बंगाल, झारखंडमध्‍ये मोठ्या गतीने सक्रिय झाला आहे. यासह नगालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही सक्रिय आहे. पण, अरुणाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, मराठवाडा, विदर्भ, तटीय आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्‍ये त्‍याची गती खूप मंदावली आहे.
मणिपूरला मदद देणार
अतिवृष्‍टीने मणिपूरमधील सर्वच नद्या, नाल्‍यांना पूर आला आहे. बहुसंख्‍य गावे प्रभावित झाली आहेत. यातून सावरण्‍यासाठी मणिपूरला मदत दिली जाणार आहे, असे आश्‍वासन केंद्र सरकाने दिले आहे. या बाबत, गृहराज्‍यमंत्री राजनाथ सिंह म्‍हणाले, ''मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्र्यांसोबत आपण दूरध्‍वनीवर चर्चा केली आहे. केंद्र त्‍याठिकाणी लक्ष ठेवून आहे. मणिपूरला सर्वप्रकारची मदत दिली जाईल,'' असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. दरम्‍यान, लँडस्लाइडच्‍या घटनेनंतर केंद्र सरकारने त्‍या ठिकाणी एनडीआरएफच्‍या टीमला पाठवले आहे. दरम्‍यान, काँग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनीही मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्रांसोबत चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली.
बंगाल, ओडिशा आणि राजस्थानमध्‍ये महापूर
पश्चिम बंगालमध्‍ये कोलकाता, वर्धमानसह 12 जिल्‍ह्ये पाणी-पाणी झाले आहेत. राज्यत 1.19 लाख लोकांसाठी 966 रेस्क्यू कँप लावण्‍यात आले आहेत तर 124 मेडिकल कॅप आहेत. अतिवृष्‍टीने राज्यात 1.8 लाख घरांचे नुकसान झाले आहे. कोलकातातील बहुतांश भाग पाण्‍याखाली आहे. ओडिशामध्‍येही हीच स्थिती आहे. तिथे पाच लाख नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत तर राजस्थानातील 128 गावांत पाणी घुसले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....