आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशात एक फुटापर्यंत हिमवृष्टी, श्रीनगर हायवे बंद, काश्मीरमध्ये 28 दिवसांचा स्टॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांपासून केरन, माछल, करनाह, गुरेज, शोपिया, सोनमर्ग, अमरनाथ या भागांत सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पहलगाममध्ये सर्वाधिक 5 सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जवाहर टनलजवळ बर्फ जमा झाल्याने श्रीनगर नॅशनल हायवे बंद करण्यात आला आहे. लेहमध्ये -9.5 डिग्री टेम्परेचर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने 28 दिवसांचे रेशन आणि इंधन याचा स्टॉक केला आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात शिमलासह सहा जिल्ह्यांत हिमवादळ आले. त्यामुळे रोहतांग आणि सोलंग नालामध्ये सुमारे सव्वा फूट आणि मनालीत एक फुटापर्यंत हिमवृष्टी झाली. शनिवारी दिल्लीत पाऊसही झाला. 

काश्मीरमध्ये 250 हून अधिक गाड्या अडकल्या आहेत 
- काजीकुंडमध्ये 4.2 सेमी पाऊस झाला आहे. लेहमध्ये तापमान उन्हे 9.5, कारगिलमध्ये उन्हे 9, गुलमर्गमध्ये उन्हे 6.5 अंशापर्यंत खाली गेले आहे. 
- श्रीनगर नॅशनल हायवे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 250 हून अधिक गाड्या अडकल्या आहेत. 
- राज्य सरकारने 28 दिवसांचे रेशन आणि पेट्रोल-डिझेलसारख्या महत्त्वाच्या बाबींचा स्टॉक केला आहे. 

हिमाचलमध्ये हिमवृष्टी सुरू 
- हिमाचलमध्ये शिमलासह कुफरी, नारकंडा, मशरोबा परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. 
- रोहतांग आणि सोलंग नालामध्ये सुमारे सव्वा फूट आणि मनालीच एक फुटापर्यंत हिमवृष्टी झाली. 
- हिमवृष्टीमुळे पर्यंटक आनंदी असून ते भरपूर एन्जॉय करत आहेत. 
- मनालीपासून रोहतांगमध्ये 300 गाड्या अडकल्या आहेत. रोहतांग दर्रा आण जलोडी दर्रामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
- जोरदार हिमवृष्टीमुळे अनेक परिसरातील वीज गायब झाली आहे. 

दिल्लीत पाऊस 
- शनिवारी दिल्लीच्या हवामानातही मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळाला.  
- सकाळी याठिकाणी दाट ढग दाटलेले होते. त्यानंतर पाऊसही झाला. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हिमवृष्टीनंतरचे हिमाचल प्रदेशमधील PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...