आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; एक महिन्याचा पगार देण्याचे सोनिया गांधींचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ डेहराडून- उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयाचे थैमान थांबण्याची नाव घेत नसताना येत्या 24 - 25 जूनला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यापूर्वी उत्तराखंडात सुरु असलेल्या बचाव कार्यातील एक हेलीकॉप्टर शुक्रवारी डेहराडूनमध्ये कोसळले. सुदैवाने त्यात एकही यात्रेकरू नसल्याने जी‍वितहानी टळली. हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे तोही सुखरुप आहे.

कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांनी एक महिन्याचा पगार द्यावा
बचाव कार्य वेगात सुरु असून डोगराळ भागात अडकलेल्या लोकांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे. दुसरीकडे कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांनी एका महिन्याचा पगार उत्तराखंडला मदत म्हणून द्या, असे आदेशच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या वि‍विध भागात झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयात सर्वत्र हाहाकार माजला आहे. सरकारी पातळीवर 207 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी हजारोंच्यावर मृतांचा आकडा पोहोचण्याची शक्यता आहे. अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहे. उत्तराखंडच्या विविध भागात अजून 50 हजार लोक अडकले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी माहिती दिली. बचाव कार्यात वायुसेनेचे आणखी 13 हेलिकॉप्टर्स लावण्यात आले आहे. हेलिकॉप्टर्सची संख्या आता 43 झाली आहे. 33 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुढील 24 तासांत उद्‍ध्वस्त झालेले 207 मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्‍याच्या प्रश्नावर उत्तर देणे मात्र तिवारी यांनी बोलणे टाळले. अडकलेल्या लोकांना आधी सुखरुप बाहेर काढणे हे महत्त्वाचे आहे.

नरेंद्र मोदी डेहराडूनमध्ये मदत शिबिर लावणार
गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे देखील शुक्रवारी रात्री डेहराडून येथे पोहोचणार आहे. उत्तराखंडमधील पुरग्रस्त भागात मोदी पायी दौरा करणार असून मदत शिब‍िर लावणार आहे. यापूर्वी भाजपचे राष्ट्राध्यक्ष राजनाथ सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उत्तराखंडचा हवाई दौरा केला होता. परंतु त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली होती.

परंतु उत्तराखंडामध्ये बचाव कार्याचा वेग आणखी वाढविण्याची आवशक्यता आहे. दुर्गम भागात अजूनही मदत पोहोचलेली नसल्याने अडकलेल्या लोकांना अन्न-पाणी विना जगणे कठीण झाले आहे. त्यात मृतदेहाच सडा पडल्याने महामारी पसरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यात उत्तराखंड राज्यात 24 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे ढगफुटीचाही इशारा दिला आहे.


गौरीकुंड येथे हेलिपॅड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. केदार घाटीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचेही काम सुरु झाले आहे. केदार घाटीत 27,000 लोक अडकले आहेत. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर उतरण्याची परिस्थिती नसल्याने आयटीबीपीची एक तुकडी जंगातून केदार घाटीत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. आयटीबीपीचे प्रमुख अजय चड्ढा यांनी सांगितले की, केदारनाथ आणि गौरीकुंडमधील जंगलात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी भारतीय जवान जीवाचे रान करत आहेत. ऋषिकेशहून देवप्रयाग तसेच श्रीनगरपर्यंत जाणारा रस्ता खुला झाला आहे. त्यामुळे गोचर ते कर्णप्रयाग दरम्यान छोटी वाहने हळू-हळू बाहेर काढण्यात येत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा उत्तराखंडमधील महाप्रलयाची भीषणता...