आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helicopter Scam News In Marathi, Governor Investigation

हेलिकॉप्टर घोटाळा: राज्यपालांच्या चौकशीवरून संभ्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करारातील लाचखोरी प्रकरणात गोवा व पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या चौकशीवर संशय निर्माण झाला आहे. सीबीआय या दोघांना साक्षीदार म्हणून प्रश्न विचारू इच्छिते.

गोव्याचे विद्यमान राज्यपाल बी. व्ही. वांचू हेलिकॉप्टर करारावेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) प्रमुख होते. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल एम.के. नारायणन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. हेलिकॉप्टर करारातील अटीत बदल करण्यात आलेल्या बैठकांमध्ये त्यांचा सहभाग होता. अटीतील बदलानंतर ऑगस्टा वेस्टलँडने करारातील निकष पूर्ण करून कंत्राट मिळवले होते. वांचू आणि नारायणन यांच्या चौकशीसंदर्भात सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांची साक्षीदार म्हणून चौकशी झाली तरी त्यांच्याविरुद्ध खटला चालवल्यासारखे होईल, असे त्यांनी सरकारला सांगितले आहे. त्यामुळे घटनात्मक पदावरून दूर झाल्यानंतरच दोन्ही राज्यपालांची चौकशी केली जाऊ शकते.

करार रद्द
सरकारने गेल्या वर्षी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा रद्द केला आहे. हे प्रकरण ऑगस्टा वेस्टलँडकडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याशी संबंधित आहे. जवळपास 3600 कोटी रुपयांच्या या करारासाठी 360 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.