आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर अपघातानंतर प्रथमच दिसल्या हेमा मालिनी, संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजस्थानमधील अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी आज प्रथमच संसदेत उपस्थित राहिल्या. गेल्या महिन्यात राजस्थानमधील दौसा येथे त्यांची मर्सिडीज कार एका मारुती कारला धडकली होती. अपघातात त्यांच्या चेहर्‍याला मार लागला होता, तर मारुती कारमधील एका चिमुरडीचा मृत्यू झाला होता.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी त्यासाठी आज उपस्थित होत्या. गडद निळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या हेमा मालिनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान सभागृहात पोहोचल्या. सर्वप्रथम त्यांनी किरण खेर यांची भेट घेतली आणि एकमेकींची विचारपूस केली.
त्यानंतर भाजपचे साक्षी महाराज, रतनलाल कटारिया यांच्यासोबत त्या बोलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रीय सुळे यांनी देखील हेमा मालिनींची विचारपूस केली. काही खासदार लांब उभे असल्याकारणाने त्यांनी इशार्‍यानेच त्यांना आता सर्व ठिक असल्याचे सांगितले.

हेमा मालिनी भरतपूर मार्गे मथुरेतून जयपूरला निघाल्या होत्या. दौसा येथे वळणावर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...