आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hemant Soren Sworn In As Chief Minister Of Jharkhand.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमधील राष्‍ट्रपती राजवट संपली, हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्‍यमंत्रीपदाची शपथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - झारखंडमधील राष्‍ट्रपती राजवट आज (शनिवार) हटविण्‍यात आली असून झारखंड मुक्ती मोर्चाच्‍या विधीमंडळ पक्षाचे हेमंत सोरेन यांना पर्यायी सरकार स्‍थापनेसाठी राज्‍यपाल सय्यद अहमद यांनी आमंत्रित केले. त्‍यानंतर हेमंत सोरेन यांनी आज सकाळी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल झारखंडमधील राष्‍ट्रपती राजवट हटविण्‍याचा निर्णय घेतला. हा निरोप रात्री उशीरा मिळाला, असे राज्‍यपालांचे प्रधान सचिव एन. एन. सिन्‍हा यांनी सांगितले. सोरेन हे राजभवनातील "बिरसा मंडप'मध्ये सकाळी साडेनऊ वाजता शपथ घेतली. सोरेन यांच्याबरोबर कॉंग्रेसचे नेते राजेंद्रप्रसाद सिंह आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या अन्नपूर्णादेवी यांचाही शपथविधी झाला. कॉंग्रेस, राष्‍ट्रीय जनता दल आणि काही अपक्षांच्‍या पाठींब्‍यावर सोरेन सरकार स्‍थापन करणार आहेत. त्‍यांनी राज्‍यपालांना 43 आमदारांच्‍या पाठींब्‍याचे पत्र दिले आहे. बहुमत सिद्ध केल्‍यानंतर ते मंत्रिमंडळाचा विस्‍तार करणार आहेत.