आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Herald Case: Sonia, Rahul Gandhi Get Relief From HC

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : राहुल, सोनियांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह सहा जणांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाची सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली आहे. सर्व सहा जणांना स्थनिक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून पटियाला हाऊस न्यायालयात सोनिया यांच्यासह सहा जणांना समन्स जारी करण्यात आले होते. त्यांना सात ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. यानंतर संबंधितांनी त्यास आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने याप्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी सुनावणी केली. मात्र, स्वामी आपला युक्तिवाद पूर्ण करू शकले नाहीत. यानंतर न्यायालयाने सुनावणी लांबणीवर टाकली.

काय आहे प्रकरण? : नॅशनल हेरॉल्ड कंपनी एजेएलशी संबंधित हे प्रकरण आहे. काँग्रेसने पहिल्यांदा एजेएलला (असोसिएटेड र्जनल लिमिटेड) पक्षनिधीतून 90.25 कोटी रुपये कर्ज दिले होते. यानंतर सोनियांसह सहा लोकांनी 50 लाख रुपये भांडवलातून यंग इंडियन कंपनी स्थापन केली होती. यंग इंडियनने एजेएलचे 90 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करून त्यांचे देणे आपल्या नावे केले. यानंतर काँग्रेसने एजेएलचे कर्ज माफ केले.
याचा फायदा यंग इंडियन आणि त्याच्या मालकांना झाला. याच पद्धतीने एजेएल आणि त्याच्या मालमत्तांवर यंग इंडियनचा ताबा आला.

हे आहेत सहा आरोपी : सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा.