आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा शपथविधी : पाहुण्यांच्या नावांवरून वाद, तर मेन्यूमध्ये आला गुजरातचा ढोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नई दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याबाबात काही वाद सुरू झाले आहेत. सोहळ्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे यांना आमंत्रण दिल्याने एआईएडीएमके प्रमुख जयललिता, डीएमके प्रमुख करुणानिधी आणि एमडीएमके प्रमुख वायको हे नाराज आहेत. जयललिता यांनी राजपाक्षे यांना आमंत्रित करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तर तामिळनाडूमध्ये भाजपचा सहकारी पक्ष असणार्या एमडीएमके प्रमुख वायको यांनी शुक्रवार भाजप अध्‍यक्ष राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. 25 मिनटांच्या बैठकीत मोदींनी काळजीपूर्वक आपले म्हणणे ऐकले व आपण राजपाक्षे यांच्या विरोधात पुरावे दिल्याचे वायको यांनी सांगितले.
सोहळ्याच्या तयारीला वेग
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. सोमवारी 26 मे रोजी राष्ट्रपति भवनाच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. सुमारे तीन हजाराहून अधिक नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहेत. यात सार्क देशांच्या प्रमुखांचाही समावेश असेल.

पुढे वाचा - सोहळ्याचा मेन्यू आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत