नवी दिल्ली - दिल्लीतील वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण जगाला देशाला हेलावून टाकले होते. सर्वत्र माध्यमांवर त्या वाघाची आणि शिकार झालेल्या निष्पाप तरुणाचीच चर्चा सुरू होती. ह्या बातम्या पाहिल्यानंतर या घटनेतून कोणाचा तरी फायदा होईल असे कोणाला वाटलेही नसेल. मात्र या घटनेमुळे एका व्यक्तीचे नशिब पालटून गेले आहे. आश्चर्य वाटले ना? असे कसे काय घडू शकते. मात्र हे खरे आहे.
23 सप्टेंबरला दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील विजय नावाच्या पांढर्या वाघाने २२ वर्षीय मकसूद या तरूणावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या संपूर्ण हल्ल्याचे फोटो सोशल नेटवर्कींग आणि माध्यमांवरून प्रसारीत झाले. विशेष म्हणजे हे फोटो पाहाणे अथवा व्हिडीओ पाहाणे बच्चे कंपनीला खुप आवडू लागले. त्यामुळेच विजयला पाहायला येणार्या बच्चे कंपनीने प्राणी संग्रहालयाजवळ असलेल्या खेळण्यांच्या दुकानादाराचे नशीबच उघडले. पूर्वी या दुकानदाराच्या दुकानात जेमतेमच गिर्हाईक यायचे. मात्र आता दुकानात असलेल्या पांढर्या वाघाच्या बाहूल्या घेण्यासाठी अनेक लहान मुलांची गर्दी असते.
दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, "पुर्वी माझ्या दुकानात जास्त कोणी येत नसे. विशेष म्हणजे या दिवसात तर पर्यटक कमीच असायचे. मात्र विजयच्या घटनेनंतर पर्यटकांचा येथे येण्याचा ओघ वाढला आहे. त्यातही विशेषकरून लहान मुलांचा जास्त समावेश असतो. जेव्हा विजयला पाहून ही मुले बाहेर दुकानाकडे येतात, तेव्हा ते या विजय सारख्या दिसणार्या मिमिएचर (वाघाची बाहूली) कडे आकर्षित होतात. ही बाहूली पाहाताच ते मागायला लागतात. घटनेच्या दिवसापासून आता पर्यंत जवळपास माझे ६० मिमिएचर विकले गेले आहेत. आता तर यांच्या विविध आकारातील बाहूल्यांची आम्ही ऑर्डरच दिली आहे. पुर्वीपेक्षा आता माझा धंदा दुपटीने वाढला आहे."
पुढील स्लाईडमध्ये वाचा, काय झाले होते २३ सप्टेंबरला...
सौजन्य - एचटी