आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जस्टीस गंगेलेंनी मुलीसमोर माझ्या कमरेवर हात ठेवला\', महाभियोगाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ ग्वाल्हेर - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठातील न्यायाधीश एस.के.गंगेले यांच्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश असलेल्या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आता त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी जोरकसपणे पुढे येत आहे. दुसरीकडे त्यांच्यावर कारवाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

माजी अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंह यांनी महिला न्यायाधीशाला पाठिंबा दिते न्यायाधीश गंगले यांच्यावर महाभियोगांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. जयसिंग म्हणाल्या, 'त्यांच्याविरोधात संसदेत महाभियोगाची कारवाई सुरु केली पाहिजे. सर न्यायाधिशांनी त्यांची चौकशी केली पाहिजे.' दुसरीकडे महिला न्यायाधिशाने सर न्यायाधिशांना दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी तक्रारीत लिहिले आहे, 'एकदा तर एका विवाह समारंभात या न्यायाधीशाने माझ्या 16 वर्षीय मुलीसमोर 'तुझ्या कामापेक्षा तू किती तरी अधिक सुंदर आहेस..’ अशी शेरेबाजी केली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर पुढे मला खालून वरपर्यंत न्याहाळत माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाले, 'मला तुला जवळून पाहायचे आहे.' हा प्रसंग माझ्या मुलीसाठी एक धक्का होता. मी न्यायाधीश महोदयांना त्यांचे हे वागणे योग्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची ती वागणूक अतिशय आक्षेपार्ह्य होती. त्या सोहळ्यातून मी रडतच बाहेर पडले.'
न्यायाधीश गंगेलेंवर कारवाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका
गेल्या सहा महिन्यात न्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप लागण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी जस्टीस गांगुली आणि स्वतंत्रकुमार यांच्यावर महिला इंटर्नचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. जस्टीस गंगलेंवर झालेल्या आरोपानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांनी हे आरोप अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. माजी अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल आणि लैंगिक शोषण झालेल्या महिला इंटर्नला न्याय मिळवून देण्यासाठी लढलेल्या इंदिरा जयसिंग यांनी म्हटले आहे, की जर न्यायाधीशच सुरक्षीत नसतील तर, सर्वसामान्य व्यक्ती न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवणार. या प्रकरणी सर्वप्रथम न्यायाधीश गंगेले यांना पदावरुन दूर केले पाहिजे.
अ‍ॅड. एम.एल. शर्मा यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करत आरोपी न्यायाधीशांवर कारवाईची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टातील महिला वकीलांनीही गंगेले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मागण्यांचे निवेदन सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनला दिले आहे.