आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Court Rejects Petition File On Suspension Of Durga Shakti Nagpal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्ती नागपाल यांच्‍या निलंबनाबाबत सुनावणीस न्‍यायालयाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशमधील आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्‍या निलंबनाविरुद्ध दाखल केलेल्‍या जनहित याचिकेवर सुनावणी करण्‍यास उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला आहे. हा 'मालक आणि सेवक' असा प्रश्‍न असून स्‍वतः नागपाल यांनी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही, असे न्‍यायालयाने नमूद केले. लखनौच्‍या सामाजिक कार्यकर्त्‍या नूतन ठाकूर यांनी ही याचिका होती.

नागपाल यांच्‍या निलंबनावरुन वाद वाढत आहे. मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांनी निलंबन योग्‍य ठरविले. परंतु, ज्‍या आधारावर निलंबन झाले, त्‍यात नागपाल यांचा हात नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यानुसार धार्मिक स्थळाची भिंत नागपाल यांच्या आदेशावरून नव्हे तर गावकर्‍यांनीच पाडली. स्थानिक लोकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु लोकांनी जुमानले नाही. नागपाल यांच्या करिअरला सुरू होऊन जेमतेम दहा महिने झाले आहेत. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, असे ऑल इंडिया आयएएस संघटनेचे अध्यक्ष संजय भूस रेड्डी यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते नागपाल यांच्‍या निलंबनाच्‍या बढाया मारत फिरत आहेत. आपल्‍या सांगण्‍यावरुन केवळ 41 मिनिटांमध्‍ये नागपाल यांचे निलंबन झाले, असा दावा सपाचे नेते नरेंद्र भाटी यांनी केला आहे. भाटी यांनीच वादग्रस्‍त मशिदीच्‍या बांधकामाचे भूमिपूजन केले होते, असे बोलले जात आहे. परंतु, त्‍यांनी त्‍यास नकार दिला. त्‍यांनी केवळ मदत म्‍हणून 51 हजार रुपयांची देणगी दिली होती, असे भाटी यांनी सांगितले.