आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत कोणी कुणाचे ऐकावे हे काेर्टच ठरवणार, केंद्राच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत आदेश नेमका कोणी द्यायचा आणि त्याचे कोणी पालन करायचे? नायब राज्यपाल यांनी सरकारचे ऐकायचे की राज्य सरकारने राज्यपालांचे? याचा फैसला आता न्यायालयातच होणार आहे. कारण दिल्ली सरकारने हे अधिकार निश्चित करण्यासाठी काढलेल्या केंद्राच्या अधिसूचनेला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

अधिसूचनेत पोलिस, जमीन, अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या या प्रकरणांत नायब राज्यपालांना अंतिम अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे केंद्राने आपल्याच अधिसूचनेला ‘संदिग्ध’ असल्याचे म्हणणाऱ्या उच्च न्यायालयाच्या विरोधात अगोदरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता दोन्ही कोर्टांच्याद्वारे शुक्रवारी सुनावणी होणार आहे. केंद्राच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी म्हटले, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिल्लीतील अनिश्चितता वाढली. कामकाज अधिक कठीण झाले आहे. कलम २३९ एएची स्पष्ट व्याख्या होणे गरजेचे आहे. जेणेकरून दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संतुलन राखणे शक्य होऊ शकेल. राज्याच्या दहशतवाद प्रतिबंधक दलाकडून अटक करण्यात आलेल्या दिल्ली पोलिसांच्या कॉन्स्टेबलच्या जामिन याचिकेला फेटाळून लावताना हायकोर्टाने अधिसूचना संभ्रम निर्माण करणारी असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर नायब राज्यपाल दिल्ली सरकारचा निर्णय मानण्यास बांधील असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, दिल्ली सरकार व नायब राज्यपाल यांच्या अधिकारांचा वाद आता न्यायालयात पोहचल्याने दिल्लीमध्ये इतर निर्णयही प्रलंबित राहण्याची शक्यता असून निकालानंतरच ते घेतले जातील.

नायब राज्यपाल केंद्रीय गृहसचिवांना भेटले, गृहमंत्री राजनाथ यांच्याशीही फोनवरून चर्चा
नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गुरूवारी केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांची भेट घेतली. सुमारे २० मिनिटे त्यांची चर्चा चालली. दिल्ली विधानसभेत बुधवारी मंजूर झालेल्या अधिसूचनेबाबतच्या ठरावावर चर्चा केली. अधिसूचना घटनाबाह्य असल्याचे त्या ठरावात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या भूमिकेवर देखील चर्चा झाली. जंग यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जंग यांनी मीडियाशी याबाबत मात्र काहीही बोलण्यास नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...