आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षापूर्वीच जाहिरात करणेे बंद केले- अमिताभ, बिग बझारकडून मॅगीवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नेस्लेच्या नूडल मॅगीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बिग बाजार नावाने देशात रिटेल चेन चालवणा-या फ्यूचर ग्रुपने निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत मॅगीच्या गुणवत्तेबाबात अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत मॅगीची विक्री बंद करण्यात येईल. केंद्र सरकारच्यावतीने चालवणा-या भंडारातही मॅगी न विकण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
बिहारमधील एका न्यायालयाने मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा आणि माधुरी दीक्षितविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास त्यांना अटकही केली जाऊ शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान अमिताभ यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मला अद्याप कोणतेही नोटिस आलेली नाही. मी दोन वर्षापूर्वीच मॅगीची जाहिरात करणे बंद केले आहे. तरीही या प्रकरणी मी कायद्याला व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
दिल्लीतील मॅगीच्या 13 नमून्यांपैकी 10 नमुन्यात घातक घटक आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी या मुद्यावरून दिल्लीतील आरोग्य मंत्री व नेस्लेच्या अधिका-यांची बैठक झाली.
आरोग्य मंत्री म्हणाले, घेऊ शकतो मोठा निर्णय-
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सर्वाकडून माहिती घेतली जात आहे. दिल्ली सरकार नेस्लेच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकते.
लेडचे प्रमाण अधिक आढळले-
अधिका-यांनी सांगितले की, दिल्ली शहरातील विविध विभागातून मागील आठवड्यात मॅगीचे 13 नमुने घेण्यात आले. त्यातील 13 पैकी 10 नमुन्यात लेडचे प्रमाण अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात आढळले. याचे प्रमाण 2.5 पीपीएम इतके आढळले. मसाल्यातील पाच नमुन्यात मोनोसोडियम ग्लूटामेट आढळून आले आहे. मात्र, याची पॅकेटवर किंवा त्याच्या लेबलवर माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून सूचना मिळताच खाद्य सुरक्षा अधिका-यांनी हे नमुने घेतले होते.
अनेक राज्यांत मॅगीची होतेय तपासणी-
मॅगीत घातक घटक आढळल्याने देशभरातील विविध शहरात व राज्यांत मॅगीचे नमुने तपासले जात आहेत. केरळमधील सरकारी दुकानामधून मॅगीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्येही मॅगीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, नेस्ले इंडियाने दावा केला आहे बाहेरच्या प्रयोगशाळेतसुद्धा व आपल्या अंतर्गत तपासणीत मॅगी खाण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत मॅगीचे दोन नमुने तपासले गेले मात्र तेथे काहीही हानिकारक घटक सापडले नाहीत. मात्र, गोरखपुर आणि कोलकाता येथील नमुन्यात धोकादायक घटक आढळून आले आहेत. मॅगीची जाहिरात अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सनी केली आहे. त्यामुळे ते ही अडचणीत आले आहेत.