आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली काबूल विमानाच्या अपहरणाचे अलर्ट, सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअर इंडियाचे दिल्ली-काबूल विमानसेवेतील विमान अपहरण होण्याची शक्यता असल्याचे अलर्ट गुप्तचर संस्थांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या विमानतळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काबूलमध्येही मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे.

आगामी प्रजासत्ताक दिन आणि ओबामांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. ओबामा 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी असणार आहेत. दरम्यान, या अलर्टनंतर दिल्लीबरोबरच देशभरातील विमानतळांवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या कोलकाता येथील कार्यालयात विमानाचे अपहरण होणार असल्याचा इशारा देणारा एक फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. बंगाली भाषेत हा फोन आला अशल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पण अधिका-यांनी नेमके कोणते विमान लक्ष्य केले जाणार याबाबत मात्र माहिती दिली नव्हती. या प्रकारानंतर वरिष्ठ अधिका-यांनी मोठ्या प्रमाणावर बैठका घेण्यास सुरुवात केली असून, देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.