आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-काबूल विमान अपहरणाचा कट; गुप्तचर संस्थांचा इशारा, देशात विमानतळांवर बंदोबस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहशतवादी एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचे अपहरण करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. त्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील सर्व प्रमुख विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असतानाच हा इशारा देण्यात आला आहे.
कोलकात्यात शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी शहर बुकिंग कार्यालयात अज्ञात व्यक्तीने विमानतळ उडवून देण्याची तसेच विमानाचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. हा बेनामी कॉल बंगाली भाषेतून करण्यात आला होता. कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर नागरी उड्डयन सुरक्षा विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि एआयएच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. धोका टळावा म्हणून अलर्टनंतर अनेक स्तरांवर तपासणी केली जात आहे. प्रवासी तसेच केबिन क्रूचीही तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. अतिरेक्यांनी 1999 मध्ये आयसी-814 विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला घेऊन गेले होते. या वेळीही अशीच घटना घडेल, अशी शक्यता आहे.
काँग्रेस पाकधार्जिणा पक्ष : भाजपचा आरोप
काँग्रेस पक्ष दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही राजकारण करत आहे. काँग्रेसची ही भूमिका पाकिस्तानला ऑक्सिजन देणारी आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ता डॉ. संबित पात्रा यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेसने भारताच्या हेतूबाबतच प्रश्न निर्माण केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण ज्या पद्धतीने प्रश्न निर्माण केले जात आहेत ते पाकिस्तानची मदत करणारे आहेत.
अतिरेकी असल्याचा पुरावा नाही : काँग्रेस
सरकार या प्रकरणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अजयकुमार यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेऊन केला होता. कुठलाही पुरावा नसताना सरकार माध्यमांसमोर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता अशा स्वरूपात सादर करत आहे. नौकेत अतिरेकीच होते हे कशाच्या आधारावर म्हटले जाऊ शकते? सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
पाक संशयितास मेरठमध्ये अटक
मेरठ- संशयास्पदरीत्या फिरणा-या एका पाकिस्तानी तरुणास मेरठच्या बेगमपूल येथे पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्यासोबत त्याचा मामेभाऊही होता. सईद असे या तरुणाचे नाव असून, तो पाकिस्तानच्या मुलतान जिल्ह्यातील बस्ती जाखड सिकंदराबादचा आहे.