आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh, Along With Wife, Appearances In Court

हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह पत्नीसह न्यायालयात हजर, बेहिशेबी संपत्ती प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे पत्नी प्रतिभा यांच्यासह बेहिशेबी संपत्ती प्रकरणात सोमवारी न्यायालयात हजर झाले. १० कोटी रुपयांच्या या प्रकरणात वीरभद्र यांनी जामीन मागितला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याला उत्तर देण्यासाठी न्यायमूर्तींनी या प्रकरणाची सुनावणी २९ मेपर्यंत पुढे ढकलली.
 
सीबीआयच्या ५०० पानांच्या आरोपपत्रानुसार, वीरभद्रसिंह यांनी केंद्रीय मंत्री असताना उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा १० कोटी रुपयांची जास्त संपत्ती कमावली. या प्रकरणी सिंह आणि इतर आठ जणांविरोधात फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात २२५ साक्षीदार आणि ४४२ पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. सीबीआयच्या अहवालात एलआयसी एजंट आनंद चौहान यांचेही नाव आहे, तो सध्या तुरुंगात आहे.
 
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौहानला गेल्या वर्षी जुलै रोजी दुसऱ्या मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले आहे. सिंह यांना अटक करताच त्यांना चौकशीत सहभागी करून घेतले जावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने एप्रिल रोजी सीबीआयला दिले होते.
बातम्या आणखी आहेत...