आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण जिंकत हिना सिद्धूने मिळवले ऑलिम्पिक तिकीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताची अव्वल नेमबाज हिना सिद्धूने येथील आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीसह तिने रियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळवला.

२६ वर्षीय हीना सिद्धू ऑलिम्पिक कोटा मिळवणारी भारताची नववी नेमबाज ठरली. तिने चांगली सुरुवात करत ३८७ गुणांसह पात्रता स्पर्धेत पहिले स्थान मिळवले. फायनलमध्ये १९९.४ गुणांची कमाई करत चिनी तैपेईच्या तिएन चिये चेन हिला १.३ ने मागे सोडले. तैयपैची तिएन दुसऱ्या स्थानावर राहिली.