आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड मदतनिधीच्या नावाखाली हिंदू कॉलेजच्या प्राचार्यांची हॉस्टेलमध्ये \'ओली\' पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने एकीकडे गरीबीची नवी व्याख्या तयार केली आहे, तर उत्तराखंड महाप्रलयातील पीडितांसाठी निधी गोळा करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात झालेली पार्टी वादाच्या भोव-यात अडकली आहे. हिंदू कॉलेजच्या 'आहा'तर्फे (असोसिएशन ऑफ हिंदू होस्टेल एलुमनी) आयोजित ओल्या पार्टीला महिला वॉर्डन डॉ. पुनम सेठी यांनी विरोधा केला आहे. त्याविरोधात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिनेश सिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

डॉ. सेठी यांनी लिहिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे, की त्यांना विरोध केल्यानंतरही हिंदू कॉलेजच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत हॉस्टेलमध्ये 13 जुलै रोजी ही ओली पार्टी झाली. यात 92 लोक सहभागी झाले होते. यातील काहींनी महिला वॉर्डनच्या मनाईवर फेसबुकवर आक्षेपार्ह्य कॉमेंट्सही केल्या आहेत.