आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Group Asks Amazon To Stop Selling Leggings With Images Of Hindu Gods

Amazon ने केला हिंदूंचा अपमान?; देवीदेवतांचे फोटो लेगिंग्सवर प्रिंट केल्याने वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य फोटो

नवी दिल्ली - जगप्रसिध्द ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या लेगिंग्सवर हिंदू देवी-देवतांचे फोटो लावण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनच्या या जाहिरातीमुळे हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याने वादाला सुरूवात झाली आहे.
हिंदू धर्मियांनी अ‍ॅमेझॉनला याबद्दल अनेक ईमेल पाठवले असून ह्या लेगिंग्सच्या विक्री थांबवण्याची मागणी केली आहे. युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदूझम यांनी या बाबतीत विरोध केला आहे. अमेरिकेतील नेवाडा येथे असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष राजन जेड याबद्दल म्हणाले की, कोणत्याही कमरेखालील वस्त्रांवर हिंदू देवी देवतांचे फोटो असू नयेत. हिंदू देवी-देवतांची मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दररोज पुजा-अर्चना केली जाते. या संघटनेने अ‍ॅमेझॉनला याबद्दल माफी मागण्याची तसेच हे कपडे आपल्या वेबसाईटवरून काढण्याची मागणी केली आहे.
अ‍ॅमेझॉनवर विक्रीस ठेवण्यात आलेल्या या लेगिंगला यिजम ब्रँडने तयार केले असून याची किंमत 3000 रुपये ठेवण्यात आली आहे. या कपड्यांवर गणपती, महादेव, ब्रम्हा, हनुमान, राम, राधेकृष्ण इत्यादी हिंदू देवीदेवतांचे फोटो छापण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, अ‍ॅमेझॉन वेबसाइटवर विक्रीस ठेवण्यात आलेल्या हिंदू देवीदेवतांचे लेगिंग्सवरील आक्षेपार्ह्य फोटो...