आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mahasabha Looks For Christians Muslims On Valentines Day

\'व्हॅलेंटाइन डे\'ला मुस्लिम - ख्रिश्चन मुलांवर असणार हिंदू महासभेचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद - आज देशात आणि जगभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा होत असताना दिल्लीत अखिल भारतीय हिंदू महासभा हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविणार्‍या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय युवकांवर नजर ठेवणार आहे. या दोन्ही समुदायांच्या युवकांची ओळख पटविण्यासाठी हिंदू महासभेचे लोक मतदार यादी घेऊन फिरत आहे. एक आठवड्यापासून हिंदू महासभेचे हे अभियान सुरु आहे. याचे नेतृत्व महासभेचे समन्वयक ओमजी करत आहेत. दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओमजी यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. हिंदू महासभेच्या या अभियानाला काँग्रेस प्रणित एनएसयूआय आणि इतर काही संघटनांनी विरोध केला आहे.
... तर अपहरण करुन लावून देणार लग्न
ओमजी यांनी सांगितले, की हिंदूंना संघठीत करण्याचे काम आम्ही आधीपासून करत आहोत. दिल्ली निवडणुकी दरम्यान देखील आम्ही ते केले होते. 'व्हॅलेंटाइन डे'च्या अभियानाबद्दल ते म्हणाले, 'हिंदू समुदायाच्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणर्‍या मुस्लिम आणि ख्रिश्चन मुलांची यादी आमच्याकडे तयार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने ही यादी तयार केली आहे.' हिंदू महासभेचे लोक आज दिवसभर जिथे-जिथे 'कपल्स' जाऊ शकतात अशा ठिकाणांवर लक्ष ठेवणार आहेत. ओमजी यांनी त्यांच्याकडील यादी जाहीर करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, 'हिंदू मुलींसोबत आढळून आलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या युवकांना त्यांनी हिंदू धर्म स्विकारुन लग्न करावे असे प्रेमाने समजावून सांगू. आणि त्यांनी तरीही नकार दिला तर त्यांचे अपहरण करुन हिंदू पद्धतीने त्यांचे लग्न लावून देऊ.'
हिंदू महासभेच्या विरोधात अनेक संघटना
हिंदू महासभेच्या या अनोख्या अभियानाविरोधात काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय' आणि इतर विद्यार्थी संघटना उभ्या ठाकल्या आहेत. एनएसयूआय व नॅशनल स्टुडेंट ऑर्गनायझेशन यांनी हिंदू महासभेच्या कार्यालयाबाहेर 'लव्ह परेड' आंदोलन केले. हिंदू महासभेच्या अभियानाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 'लव्ह परेड' आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाब भेट दिले.
शिवसेनेच्या भूमिकेत बदल
'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणे हे पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण असल्याचा आरोप करुन शिवसेना या 'डे' संस्कृतीला विरोध करत आली आहे. यंदा मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणार्‍या तरुणांना आमचा विरोध नसल्याचे म्हटले आहे. एका वृत्तावाहिनीने म्हटले आहे, 'आदित्य यांनी शिवसैनिकांनी 'कपल्स'ला त्रास देऊ नये असा आदेश दिला आहे.'

पुढील स्लाइडमध्ये, औरंगाबादेत प्रेमीयुगुलांवर संघटनांचे लक्ष