आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mahasabha To Khans Of Bollywood Convert If You Love Your Wifes

पत्नीवर खरं प्रेम असेल तर स्विकारा हिंदु धर्म; शाहरुख, आमिर आणि सैफला आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सैफ अली खान, शाहरुख खान आणि आमिर खान)

नवी दिल्ली- अखिल भारतीय हिंदु महासभेने बॉलीवूडमधील तीन खान अभिनेते अर्थात शाहरुख, आमिर आणि सैफला एक आव्हान केले आहे. ते म्हणजे, शाहरुख, आमिर आणि सैफ हे तिघे जर आपापल्या पत्नींवर इकके प्रेम करतात, मग त्यांनी हिंदु धर्म देखील स्विकारावा. तिन्ही खान अभ‍िनेत्यांनी हिंदू धर्माच्या महिलांशी विवाह केला आहे.

गौरी, किरण राव आणि करीना कपूर यांच्याशी विवाह करणारे त्यांचे पती क्रमश: शाहरुख खान, आमिर खान आणि सैफ अली खानने हिंदु धर्म स्विकारावा, असे आव्हान करणारा संपादकीय लेख 'हिंदु सभा वार्ता' या साप्ताहिकात प्रकाशित झाला आहे. हिंदु पत्नी मान्य आहे. तिच्यावर खरे प्रेम करतात, मग हिंदु धर्म का स्विकारत नाही? असा सवाल या तिन्ही अभ‍िनेत्यांना करण्यात आला आहे. याशिवाय फरदीन खान आणि इमरान खानवर निशाणा साधला आहे. या दोघांनी देखील हिंदु महिलांशी विवाह केला आहे.

तिन्ही खान अभिनेत्यांना आम्ही आव्हान केले आहे की, जर त्यांचे त्यांच्या पत्नींवर खरे प्रेम असेल तर त्यांना हिंदु धर्म स्विकारायला हवा, असे 'हिंदु सभा वार्ता'चे प्रकाशक आणि संपादक मुन्नाकुमार सिंह यांनी सांगितले.

हिंदु राष्‍ट्रातच हिंदुंविरोधात कट शिजवला जात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, करीना कपूर, गौरी, किरण राव, रिना दत्ता सारख्या अभिनेत्रींना 'लव्ह जिहाद'च्या शिकार बनवण्यात आल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शाहरुख-गौरी, सैफ-करीना आणि आमिर-किरणची छायाचित्रे...