लखनौ (उत्तर प्रदेश)- देशाशी गद्दारी करीत असलेल्या मुस्लिमांनी देश सोडून जावे, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. शिवाय यासंदर्भात महासभेने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी देश सोडून जावे, असे महासभेचे कार्यवाहक कमलेश तिवारी यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव यांना लिहिले पत्र
कमलेश तिवारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र लिहिले आहे. याबाबत ते म्हणाले, की आम्ही 30 एप्रिल रोजी आंदोलन पुकारले आहे. आझम खान, असदुद्दीन ओवेसी आणि इमाम बुखारी यांच्यामुळे हिंदू विरोधी वातावरण तयार होत आहे. याची माहिती आम्ही अखिलेश यांना पत्राद्वारे दिली आहे. भारतात केवळ हिंदूंनी राहावे. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, उद्या जंतरमंतरवर करणारे धरणे आंदोलन...