आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणीसाठी हिंदू जबाबदार, मुस्लिमांनाही मारले; PAK मध्ये शिकवला जातो असा इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानी शाळांमध्ये मुलांना भारताच्या फाळणीचे जे धडे दिले जातात त्यात भारताला त्याततही येथील हिंदूंना खलनायकाच्या रुपात दाखवले जात आहे. तेथील सरकारने मान्यता दिलेल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये 70 वर्षांपूर्वीच्या भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यानंतर झालेल्या दंगलींसाठी हिंदू जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. त्यानंतर मोहम्मद अली जीना पाकिस्तानचे तर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
 
भारत-PAK विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळा इतिहास
- बलूचिस्तानमध्ये 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकात हिंदूंना 'ठग' म्हटले आहे. हे ठग मुस्लिमांची लुटपाट करुन त्यांची शस्त्रे, संपत्ती लुटून हत्या करत होते. मुस्लिमांनी भारत सोडावा यासाठी त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. 

- पंजाब प्रांतातील 17 वर्षांचा अफजल याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'त्यांनी आमचा अपमान केला त्यामुळे आम्ही पाकिस्तानची निर्मिती केली', असेच त्याला शिकवले गेले आहे. 
- दुसरीकडे, भारतात फाळणीबद्दल मुलांना शिकवले जाते की भारतीय स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधी हे फाळणीच्या विरोधात होते. त्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. मुस्लिम लिगचे प्रमुख मोहम्मद अली जिना यांनी मात्र स्वतःला गांधींच्या विचारांपासून वेगळे केले आणि त्यांना स्वतःचा वेगला देश पाकिस्तान पाहिजे होता. 
 
पाकिस्तानात शिकवला जातो एकांगी इतिहास 
- इतिहासाच्या एका प्रकल्पावर काम करणारे कासिम असलम यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले होते. येथे त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल दोन्ही देशांमध्ये काय-काय शिकवले जाते याचा आढावा घेतला. त्यानंतर कासिम असलम म्हणाले की पाकिस्तानात एकांगी इतिहास शिकवला जात आहे. 
 
जवळपास 20 लाख लोक मारले गेले 
- फाळणी, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान एक रेष मारून वेगळे करण्याएवढी सोपी नव्हती. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकच होते. फाळणीनंतर पाकिस्तानात राहात असलेल्या अनेक हिंदूंना घर-दार, संपत्ती सोडून भारतात यावे लागले तर येथूनही लाखो मुस्लिम पाकिस्तानात गेले. त्यानंतर पाकिस्तान हे मुस्लिम बहुल राष्ट्र झाले. 
- बहुतेक हिंदूंनी पाकिस्तानातून पलायन केले आणि ते भारतात आश्रयाला आले. फाळणीच्या काळात अनेक हिंसक घटना घडल्या, हिंदू-मुस्लिम दंगे झाले. यात जवळपास 20 लाख लोक मारले गेले होते.   
बातम्या आणखी आहेत...