आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक वास्तू गुगलवर थ्रीडी रूपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालयांसह देशातील प्रमुख महानगरे आता गुगल अर्थवर थ्रीडी स्वरूपात दिसू शकतील. भारत सरकारने गुगलला यासाठी परवानगी दिली आहे. याबाबत गृहमंत्रालय तसेच गुगलच्या अधिका-यांदरम्यान नुकतीच बैठक पार पडली. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधानांचे निवासस्थान, लष्करांची मुख्यालये आदींच्या गुगलवरील थ्रीडी प्रसारणास भारत सरकारकडून आधी परवानगी नाकारण्यात आली होती. ही सर्व ठिकाणे अतिसंवेदनशील असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता भारताकडून ही सर्व ठिकाणे तसेच देशातील विविध महानगरांचे थ्रीडी चित्रण दाखवण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि अन्य अनेक देशांनी यास आधीच परवानगी दिलेली आहे. गुगल अर्थ हे गुगल या सर्च इंजिनचे एक सॉफ्टवेअर असून त्या माध्यमातून पृथ्वीचा उपग्रहीय नकाशा पाहता येतो. दरम्यान, गुगलने थ्रीडी संकल्पना आणल्याने ती आता गुगल अर्थ-७ या आधुनिक व्हर्जनवर पाहता येणार आहे. अँड्राॅइड, आयओएस, आयपॅड, आयफोन आदींवरही हे व्हर्जन उपलब्ध अाहे.