आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Of India Museum News In Marathi, President Pranav Mukherjee

इतिहासाची पाने उलगडणारे संग्रहालय; राष्ट्रपती भवनातील भव्य संग्रहालयाचे लोकार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव मुखर्जींच्या राष्ट्रपतिपदाला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून राष्ट्रपती भवनातील संग्रहालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. रायसीना हिल्सच्या विस्तीर्ण परिसरातील राष्ट्रपती भवनाच्या देखण्या प्रासादात भारतीय इतिहास जिवंत करणारे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे.

ऐतिहासिक घटनांचा आढावा
सन 1857 चे बंड, फाळणीसाठी झालेल्या बैठका आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा दरबार हॉलमध्ये झालेला शपथविधी, अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींचा आढावा या संग्रहालयात घेण्यात आला आहे.

आठवणींना उजाळा
‘नो युवर प्रेसिडेंट्स एन्क्लेव्ह’ या विभागात सर्व माजी राष्ट्रपतींच्या आठवणींना ध्वनिचित्रमुद्रित स्वरूपात उजाळा देण्यात आला आहे. याशिवाय सन 1911 पासून आजतागायत राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूही संग्रहालयात आहेत.

मोदी, मनमोहन यांची हजेरी
संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाला.याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी,माजी पंतप्रधान मनमोहनसिंग,गृहमंत्री राजनाथसिंह आदींची उपस्थिती होती.त्यानंतर या सर्व पाहुण्यांसह प्रणवदांनी संग्रहालय पाहिले.

पुढे वाचा, कधी पाहता येईल?....