आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इतिहासाचे पुनर्लेखन संशोधनानंतरच हवे’, माजी राष्ट्रपती कलाम यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इतिहासाचे पुनर्लेखन योग्य पद्धतीने संशोधन करून व्हायला हवे, अन्यथा संशोधनाला डावलून पुनर्लेखन होता कामा नये, असे मत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. विद्यमान मोदी सरकार इतिहासातील बदलासंबंधी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कलाम यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

मूल्याधारित शिक्षण आणि योग्य पालकत्व यातून गुन्हेगारी रोखणे शक्य होऊ शकते. ज्यांची सत्ता आहे ते आपल्या पद्धतीने इतिहासाचे लेखन करत असतात. वास्तविक संशोधन झाल्यानंतरच अशा प्रकारचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यानंतरच इतिहासात नेमके काय घडले होते हे समजून घेता येऊ शकते. पाठ्यक्रमातील इतिहासाचे धडे तर त्यादृष्टीने शास्त्रीय अभ्यासलेले हवेत. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून त्याचे लेखन झाले पाहिजे, असे ८३ वर्षीय कलाम यांनी ठासून सांगितले. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

तंत्रज्ञानाचा समावेश महत्त्वाचा
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली आहे. काही दशकांपूर्वी कोणी इंटरनेटची कल्पनाही केली नव्हती, परंतु आज या क्षेत्राने झेप घेतली आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात तंत्रज्ञान, संशोधन पद्धतीमधील बदल यांचा समावेश असावा.

भूकंपाचे आव्हान
जगभरातील संशोधकांसमोर सध्या भूकंपाचे भाकीत वर्तवणे ही मोठी समस्या मानली जाते. भूगर्भशास्त्र, भौतिक, रसायन, गणित आणि माहिती तंत्रज्ञान या सर्वांना मिळून एक शाखा तयार करून त्या दिशेने काही प्रयत्न करता येऊ शकतात. हे संशोधकांसमोरील मोठे आव्हान आहे. त्याचा शोध घ्यायला हवा.
बातम्या आणखी आहेत...