आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली हिट अँड रन: मद्यधुंद तरुणाने 5 मिनिटांत तिघांना उडवले, दोन ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक करण्यात आलेला ऋषभ रावत - Divya Marathi
अटक करण्यात आलेला ऋषभ रावत
नवी दिल्ली - दिल्लीत एक हिट अँड रनची केस झाली आहे, त्यात दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. एका तरुणाने ताशी 100 वेगाने कार चालवत अवघ्या 5 मिनिटांमध्ये 3 जणांना टक्कर मारली. दोघे जागेवरच गतप्राण झाले तर एक जखमी आहे. एका पोलिस कॉन्स्टेबलने आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण
- पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव ऋषभ रावत आहे. 21 वर्षांचा तरुण बीबीए स्टुडेंट आहे. त्याचे वडील व्यावसायिक आहेत.
- सोमवारी सकाळी ऋषभ पार्टीकरुन घरी परत येत असताना ही घटना घडली.
- पोलिसांनी सांगितले, की ऋषभ ताशी 100 च्या वेगाने कार चालवत होता.
- ऋषभच्या गाडीने ठोकरल्याने कामेश्वर प्रसाद (40) आणि अश्विनी आनंद (67) यांचा जागेवरच मृत्यू झाला. कामेश्वर प्रसाद हे माहिती तंत्रज्ञान खात्यात अधिकारी होते.
- जखमीचे नाव संतोष (40) असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
- गाडी चालवताना ऋषभ दारू प्यालेला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली त्यात अल्कोहलचे प्रमाण 159 एणजीसीसी असल्याचे आढळून आले. पोलिसांचे म्हणणे आहे, की लीगल लिमीट 30 एमजीसीसी असते.
- पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, LIVE फोटो..