आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hizbul Mujahideen Chief Salahuddin Still Wants To Come Back Says Dulat

हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुखाला आताही भारतात परण्‍याची इच्‍छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दहशवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनला आजही भारतात परत येण्‍याची इच्‍छा आहे, असा दावा रॉचे निवृत्‍त प्रमुख ए. एस. दुलत यांनी त्‍यांच्‍या 'कश्मीर द वायजेपी ईयर्स' पुस्‍तकात केला आहे. दुलत यांनी लिहिले, “त्‍याने भारतात येण्‍यासाठी अनेक योजना आखल्‍या होत्‍या. पण, त्‍या सर्व शासनाने हाणून पाडल्‍या. भारतातील काही व्‍यक्‍ती हिजबुलच्‍या प्रमुखाच्‍या संपर्क आहेत.” दुलत यांच्‍या दाव्‍यानुसार, हिजबुल मुजाहिद्दीन हा त्‍याच्‍या संपर्कातील व्‍यक्‍तींना भारतात परत येण्‍याचा निरोप पाठवत आहे.

सूद यांच्‍यावर आरोप

वर्ष 2001 मध्‍ये सलाहुद्दीन हा भारतात परतण्‍यास तयार होता. या बाबत आपण शेकडो वेळा सरकारला सांगितले. पण, त्‍यावेळी माझे वरीष्‍ठ विक्रम सूद यांच्‍या मनात वेगळेच काही होते: त्‍यामुळे सलाहुद्दीनला भारतात आणता आले नाही, असा दावाही दुलत यांनी केला. शिवाय ंटेलिजेंस ब्यूरो (आयबी) चेश्रीनगर चीफ के.एम. सिंह यांना सलाहुद्दीन याने फोन केला होता आणि आपल्‍या मुलाला मेडिकल कॉलेजमध्‍ये प्रवेश देण्‍याची विनंती केली होती. त्‍याला प्रवेश मिळाल्‍यानंतर त्‍याने पुन्‍हा फोन करून त्‍यांचे आभारही मानलेत. त्‍यांच्‍या या संबंधाचा फायदा त्‍याला भारतात घेऊन येण्‍यासाठी घेता आला असता, असेही दुलत यांनी म्‍हटले.