आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उतरले रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांंनी फेरीवाल्यांची भेट घेतली - Divya Marathi
राहुल गांधी यांंनी फेरीवाल्यांची भेट घेतली
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी फेरीवाल्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. रघुवीरनगर भागातील फेरीवाल्यांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याआधी त्यांनी मंदिरात पूजा केली. भाजपने राहुल यांची कृती राजकीय प्रपंच असल्याचे म्हटले आहे.
फेरीवाल्यांचा छळ रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी राहुल यांनी केली. ते म्हणाले, फेरीवाल्यांना दुकानासाठी शहरात जागा दिली जात नाही. त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. या प्रकरणात आम्ही काही मार्ग काढू. आम्ही सरकारवर दबाव आणू आणि गरिबांना त्यांचा हक्क मिळवून देऊ. राहुल आज चांगल्या मूडमध्ये होते. एका वयोवृद्ध महिलेची तक्रार ऐकल्यानंतर ते म्हणाले, तुम्ही आदेश दिला आहे, त्यामुळे नक्कीच काही तरी करणार. माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी महिला आपली मैत्रीण असल्याचे सांगितले.
फेरीवाल्यांसाठी गेल्यावर्षी कायदा
संसदेच्यादोन्ही सभागृहांत गेल्यावर्षी स्ट्रीट व्हेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडिंग) विधेयक मंजूर झाले. हे विधेयक यूपीए सरकारने २०१२ मध्ये आणले होते. फेरीवाल्यांचा पोलिसांकडून होणारा छळ आणि स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या शोषणाला अटकाव करणे हा या कायद्याचा उद्देश होता. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन म्हणाले, व्हेंडर्सचे आधीपेक्षा जास्त नुकसान केले जात आहे. आम्ही केलेला कायदा केजरीवाल सरकार लागू करत नाही. पोलिस आणि प्रशासन हप्ते गोळा करतात.
ट्रीट व्हेंडर्स कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा.
आम्हाला आनंद झाला
राहुलगांधी यांच्यासारखा नेते आमच्यामध्ये आले. त्यांनी आमच्या अडचणी जाणून घेतल्या. रघुवीरनगरची बाजारपेठ स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यापासूनची आहे. त्यांनाही आमचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळेच राहुल यांच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्त केली.

राजकारण रुळांवर येणार नाही : नक्वी
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, हा पार्टटाइम राजकारण्याचा राजकीय प्रपंच आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्याला लोकांच्या विकासाची एवढी काळजी होती तर गेल्या दहा वर्षांत यूपीए सरकार लुटालूट करण्यात का व्यग्र होती? रस्त्यावर उतरून राजकारण केल्याने त्यांचे राजकारण रुळांवर येणार नाही.
सलमान खुर्शीद यांनी केले आणीबाणीचे समर्थन
हैदराबाद | आणीबाणीलाकाळे पर्व म्हटले असले तरी काँग्रेसने त्यासाठी माफी मागण्याची गरज नाही. १९७५ मध्ये इंदिरा सरकारच्या कार्यकाळात लागू झालेल्या आणीबाणीची कोणतीही खंत नसल्याचे पार्टीचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे.
आणीबाणी त्या काळातील गरज होती, हे जनतेने मान्य केले होते. म्हणूनच पुन्हा इंदिरा गांधींना जनमताचा कौल मिळाल्याचे खुर्शीद म्हणाले. हा घटनाक्रम पाहता आणीबाणीची कोणतीही खंत काँग्रेसला नाही, असे खुर्शीद म्हणाले. आणीबाणीला जनमान्यता नसती तर इंदिरा पुन्हा सत्तेत आल्याच नसत्या, असे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. काळाच्या निकषांवर आणीबाणीचे विश्लेषण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खंत व्यक्त करायची असेल तर तत्कालीन जनता, विरोधी पक्ष यांनीही केली पाहिजे.

आणीबाणीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक घटक जबाबदार होता, अशी भूमिका खुर्शीद यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या आणीबाणीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजप वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन काँग्रेसवर तीव्र टीका केली होती.
बातम्या आणखी आहेत...